ज्यादिवशी १४५ चा आकडा कमी होईल त्या दिवशी हे सरकार जाईल – अजित पवार

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०४ नोव्हेंबर २०२२


महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार लवकरच पडेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. त्यातच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी या सरकारच्या स्थिरतेबाबत मोठं विधान केलं आहे. जोपर्यंत १४५ आमदार एकनाथ शिंदेंच्या पाठिशी आहेत, तोपर्यंत हे सरकार चालेल. ज्यादिवशी हा आकडा कमी होईल, त्या दिवशी हे सरकार जाईल असं अजित पवार म्हणाले आहेत. राज्यातील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली सत्तेत असलेलं सरकार राष्ट्रवादीच्या अधिवेशनानंतर पडेल, असं विधान राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी केलं आहे.

शिर्डीमध्ये आजपासून राष्ट्रवादीचं दोन दिवसीय मंथन शिबीर सुरू होत आहे. या अधिवेशनासाठी राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते शिर्डीत दाखल झाले आहेत. दरम्यान, महाराष्ट्राबाहेर गेलेल्या प्रकल्पावरुन अजित पवारांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. शिंदे आणि फडणवीसांच्या अपयशामुळेच हे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकल्पांबाबत सविस्तर माहिती असल्याचा दावा त्यांनी केला आहे. शिर्डीतील राष्ट्रवादीच्या अधिवेशनात याबाबत माहिती देणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *