राज्यस्तरीय अभ्यास गटामध्ये कृषिरत्न अनिल तात्या मेहेर यांची निवड

०१ नोव्हेंबर २०२२

नारायणगांव


महाराष्ट्र शासनाने कृषी तंत्रनिकेतन इंग्रजी माध्यमाच्या धरतीवर पॅरामेडिकल व्हेटर्नरी डिप्लोमा तीन वर्ष इंग्रजी माध्यमाचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी राज्यस्तरीय अभ्यास गट माननीय आयुक्त पशुसंवर्धन महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केला आहे .या अभ्यास गटामध्ये ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष कृषिरत्न अनिल तात्या मेहेर यांची सन्माननीय सदस्य म्हणून निवड झाली आहे.

समितीने सादर केलेल्या अहवालानुसार राज्यभरामध्ये व्हेटर्नरी पॅरामेडिकल इंग्रजी माध्यम तीन वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम राबविला जाणार आहे.तसेच चालू असणारा पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका( दोन वर्ष मराठी माध्यम) हा अभ्यासक्रमही उन्नत करण्यासाठी या अभ्यास गटाने शिफारस करावी असेही सूचित करण्यात आले आहे.

राज्यस्तरीय अभ्यास गटामध्ये कृषिरत्न अनिल तात्या मेहेर यांची निवड झाल्याबद्दल आमदार अतुल बेनके यांनी त्यांचे अभिनंदन केले

या अभ्यास गटामध्ये काम करण्याची संधी ग्रामोन्नती मंडळाला मिळाली यामध्ये कृषी शिक्षण क्षेत्रात नेहमीच दिशादर्शक आणि भरीव योगदान देणारे ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल तात्या मेहेर यांनी कृषी क्षेत्रामध्ये केलेल्या भरीव योगदानामुळेच राज्य पातळीवरील धोरण ठरविणाऱ्या या उच्चस्तरीय समिती त्यांची निवड करण्यात आली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *