शिवाजीनगर भुयारी मेट्रो लवकरच धावणार

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१२ ऑक्टोबर २०२२

पुणे


फुगेवाडी ते थेट सिव्हिल कोर्ट हा मेट्रो मार्ग , त्यातील शिवाजीनगर ते सिव्हिल कोर्ट या भुयारी मार्गासह सुरू करण्यासाठी महामेट्रो प्रशासन सज्ज झाले आहे सरकारकडून यावर निर्णय होईल त्यावेळी हा मार्ग त्वरित सुरू करण्याची महामेट्रोची तयारी आहे महामेट्रो प्रशासनाच्या वतीने सोमवारी ही माहिती देण्यात आली . शिवाजीनगर भुयारी स्थानकाचे काम पूर्ण झाल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ . ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले . यावेळी प्रकल्प संचालक अतुल गाडगीळ , संगणक प्रणाली प्रमुख विनोद अगरवाल , जनसंपर्क विभागाचे कार्यकारी संचालक हेमंत सोनवणे उपस्थित होते.

सिव्हिल कोर्ट स्थानकात वनाज ते रामवाडी या उन्नत ( इलेव्हेटेड रस्त्याच्या वरून जाणारी ) मार्गावरच्या मेट्रोचे स्थानक ही आहे. इंटर चेंजिग स्थानक असल्याने भुयारी मेट्रोतून उन्नत मेट्रोत प्रवाशांना सहज जाता येण्याच्या सुविधा या स्थानकात आहेत . त्यामुळे आता पिंपरी – चिंचवड मधील प्रवाशांना मेट्रो मधून थेटकोथरूडला जाणे शक्य होणार आहे . पिंपरी ते फुगेवाडी मेट्रो सुरूच आहे . रेंजहिल पर्यंतच्या मार्गावरील दोन स्थानकांचे काम भूसंपादन उशिरा झाल्याने थोडे शिल्लक आहे . ही दोन्ही स्थानके वगळून मेट्रो सिव्हिल कोर्ट स्थानकापर्यंत नेण्यात येणार आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *