शाहूनगर येथील एच.डी.एफ.सी. कॉलनी रोड ते काका हलवाई स्वीट होम परिसरातील पार्किंग हलवावी

बातमीदार- रोहित खर्गे, पुणे विभागीय संपादक

पिंपरी- दि २५ नोव्हेंम्बर, एच.डी.एफ.सी. कॉलनी रोड ते काका हलवाई स्वीट होम या मुख्य रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वरदळ चालू असते, परंतु सदर ठिकाणच्या मुख्य रस्त्यावर अवजड वाहने ही पार्किंग केली जातात त्यामुळे सदर ठिकाणी वारंवार वाहतुकीचा अडथळा निर्माण होत आहे.
एच.डी.एफ.सी. कॉलनी रोड ते काका हलवाई स्वीट होम या मुख्य रस्त्यावर अवजड वाहने अनाधिकृतपणे पार्किंग केली जातात त्या वाहनांवर तातडीने त दंडात्मक कारवाई करण्यात करुन, तेथील मुख्य रस्ता ये जा करणारे वाहनांसाठी सुरळीत करता येईल तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही या बाबत मा. उपमहापौर यांनी वाहतूक पोलिस अधिकारी यांना पत्र ‍दिले.

शाहूनगर, संभाजी नगर येथील वीज पुरवठा बाबत…

पिंपरी चिंचवड शहरातील शाहु नगर, संभाजी नगर या ठिकाणी वारंवा वीज पुरवठा खंडीत होत आहे. त्यामुळे तेथील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे, तसेच Work From Home करणारे कर्मचारी व लहान मुलांचे ऑनलाईन शिक्षण असल्याने शैक्षणिक कामकाज व घरगुती कामकाज विद्युत पुरवठा नसल्याने होत नाही.

शाहूनगर, संभाजी नगरमधील असलेल्या जुन्या भुमिगत केबल काढुन नव्याने व जादा आवश्यकतेच्या भुमिगत केबल टाकून वीजपुरवठा तातडीने सुरळीत करण्यात यावा या बाबत मा. कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांना निवेदन दिले.