आंबेगाव : –
आंबेगाव ब्यूरोचिफ
मोसीन काठेवाडी
आंबेगाव, खेड, जुन्नर तालुक्यातील पश्चिम भागात अतिवृष्टीमुळे शेतीच्या बांधबंदिस्तीचे, पीकांचे, घरांचे व गोठ्यांचे, डोंगर माथ्यावरील रस्त्यांचे प्रचंड मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त भागाची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन पहाणी करत, नुकसानग्रस्तांशी थेट संवाद साधला.
या वेळी पूर्वाताई वळसे पाटील, आंबेगावचे प्रांताधिकारी संजय कोडेलकर ,तहसिलदार रमा जोशी ,कृषीउत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम,पंचायत समितीचे सभापती संजय गवारी,उपसभापती संतोष भोर, माजी उपसभापती नंदकुमार सोनावले,गणपतराव कोकणे, भिमाशंकर कारखान्याचे संचालक अक्षय काळे, डिंभेचे उपसरपंच प्रदीप आमुंडकर सर्व प्रशासकीय , पोलिस अधिकारी , कर्मचारी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी , कार्यकर्ते स्थानिक शेतकरी उपस्थित होते
सह्याद्रीच्या डोंगरमाथ्यांवर पाऊसाच्या अतिवृष्टीत भिमाशंकर खोरे, पोखरी घाट तसेच आहुपे खोरे, डिंभे- माळीण – कुशीरे घाटांमध्ये दरड कोसळून रस्ते बंद झाले होते. सध्या या परिसरातुन एकेरी वाहतूक सुरु असून स्थानिक नागरिकांची गैरसोय होत असल्याने रस्त्याची दुरुस्ती तातडीने करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पहाणी दरम्यान दिल्या आहेत.
पाऊसाच्या अतिवृष्टीमुळे भातशेती, आणि खरीप हंगामातील पिकांचे मोठं नुकसान झाले आहे. त्यात बांधबंदिस्तीची शेती पडकई योजनेतुन पुर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले असुन या नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत, तसेच शेतकऱ्यांना वीमा काढून देण्यासाठी कृषी विभागाने मदत करुन नुकसानग्रस्त भागातील नागरिकांचे जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्यासाठी यावेळी प्रशासनाला सुचना केल्या आहेत.
राज्यातील नाही तर देशातील साखर कारखानदारी अचडचणीत आलीय..! यंदा मोठ्या प्रमाणात साखरेचे उत्पादन झाले आहे आणि जागतिक व देशातील बाजारात साखरेची विक्री घटली आहे. देशातील सर्व साखर कारखान्यांची साखर गोडाऊनमध्ये पडुन आहे. त्यामुळे साखर कारखानदारीचे आर्थिक गणित कोलमडलय..! त्यामुळे साखर कारखान्यांची कर्ज थकलेली आहे. अशातच या कर्जाची जबाबदारी राज्य सरकारनी घेतलीय हि वस्तुस्थिती आहे.
मात्र ही कर्ज राज्य सरकारला फोडायला लागतील असं नाही या कर्जाची जबाबदारी असल्याने या बँकांना सरकारची एक सुरक्षीतता आहे. त्यामुळे पुढील काळात साखर कारखान्यांची परिस्थिती सुधारल्यास बँकांची थकबाकी भरतील मात्र सध्या सरकारकडुन या कर्जाची वसुली होणार नसल्याचे गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांनी स्पष्ट केले.
पाऊसाच्या अतिवृष्टीमुळे कोकण,सातारा,सांगली कोल्हापुर परिसरात झालेल्या नुकसानीची राज्यरकारकडुन पहाणी सुरु आहे या भागातील नुकसानीचा अंदाज काढुन मंत्रीमंडळाच्या बैठकीत विचार करुन तात्काळ मदतीचा हात राज्य सरकारकडुन दिला जाईल या दृष्ठीने काम सुरु असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.