बालाजी नगर येथील महिलांतर्फे अण्णाभाऊ साठे जयंती मोठया उत्साहात साजरी…

पिंपरी-चिंचवड
०२ ऑगस्ट २०२२


स्वतंत्र चळवळ आणि संयुक्त, महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्त्व , विचारवंत , साहित्यिक कवी , प्रभोदनकार व समाज सुधारक,साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त बालाजी नगर येथील महिलांतर्फे साडी वाटप करण्यात आली व वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाचे पुणे जिल्हा अध्यक्ष जावेद सौदागर ,व पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सालार शेख यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे डॉ .बाबासाहेब आंबेडकर ,छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटो वर पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

अनिता वैरागळ यांनी कार्यक्रम आयोजित केला होता भीमाबाई ढवळे,मथुरा बाई उपाडे ,जनाबाई शिंदे, राधाबाई पाटोळे,लक्ष्मी उपाडे,वंदना थोरात,सुनीता ढवळे,पद्मिनी बाई वाघमारे,लक्ष्मी दोनघव,जयश्री ढवळे,शांताबाई उमाप,सुनीता वाघमारे ,नंदिनी पाटोळे , कोमल उमाप , गौरी आटोटे , सुनीता आठवले , मंगल कांबळे , मंदा बागाव या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सालार शेख यांनी मार्गदर्शन केले या वेळी उपाध्यक्ष अमिल सैफी ,सरदार पठाण ,लायक अली शेख,फिरोज तांबोळी ,साबीर शेख,विनोद ढवळे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *