तुषारभाऊ हिंगे स्पोर्टस संघ ठरला आमदार चषक २०२१ क्रिकेट स्पर्धेचा मानकरी…

नामदेव ढाके स्पोर्ट फौंडेशनच्या वतीने आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे वाढदिवसानिमित्त डे नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी चिंचवड दि. ११ फेब्रुवारी : चिंचवड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे वाढदिवसानिमित्त नामदेव ढाके स्पोर्ट फौंडेशनच्या वतीने डे नाईट आमदार चषक २०२१ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत पिंपरीतील तुषारभाऊ हिंगे स्पोर्टस क्लब संघ अंतिम फेरीत विजेता तर श्री काटे स्पोर्टस, पुनावळे हा संघ उपविजेता ठरला. त्यांना अनुक्रमे करंडक व र.रु. १,५१,१११/- , र.रु. १,०१,१११/- तसेच एजे थंडर, चिखली तृतीय तर क्रेजी ईलेव्हन, वाल्हेकरवाडी या संघाला चतुर्थ क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्यांना अनुक्रमे करंडक व र.रु. ६१,१११/- , र.रु. ३१,१११/- वितरित करण्यात आले. तसेच स्पर्धेचा मानकरी प्रशांत शुक्ला ठरला. स्पर्धेचे समालोचन मनोज बेल्हेकर व राहुल बोंबे यांनी केले. मदनलाल धिंग्रा मैदान, से. २५, निगडी प्राधिकरण येथे दि. ०६ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी २०२१ या कालावधीत स्पर्धा भरविण्यात आल्या होत्या. या पाच दिवशीय स्पर्धेत ३२ संघानी सहभाग नोंदवला.


आमदार चषक २०२१ क्रिकेट स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ प्रसिध्द उद्योजक तथा माजी नगरसेवक शंकरशेठ जगताप यांचे शुभहस्ते बुधवार दि. १० रोजी पार पडला. पिंपरी चिंचवड शहरासाठी मर्यादित व शहरातील खेळाडुंना प्रोत्साहन मिळण्यासाठी या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती स्पर्धेचे आयोजक तथा सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली. यावेळी माजी राज्यसभा सदस्य अमरजी साबळे, आमदार महेशदादा लांडगे, मा. महापौर उषा उर्फ माई ढोरे, उपमहापौर केशव घोळवे, स्थायी समिती सभापती संतोष (अण्णा) लोंढे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजु मिसाळ, क्रीडा सभापती प्रा. उत्तम केंदळे, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, माजी उपमहापौर तुषार हिंगे,माजी सत्तारुढ पक्षनेता एकनाथ पवार, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, नगरसेवक शत्रुघ्न काटे, सचिन चिंचवडे, राजेंद्र गावडे, चंद्रकांत नखाते, शारदा सोनवणे, जयश्री गावडे, प्रमोद कुटे, विभिषण चौधरी, सरचिटणिस अमोल थोरात, भाजपा युवा मोर्चा सरचिटणिस अनुप मोरे, मा. स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी, युवा कार्यकर्ते शेखर चिंचवडे, प्रदेश कार्यकारीणी सदस्य अमित गोरखे, उद्योजक मिलिंद चौधरी, युवा मोर्चा अध्यक्ष संकेत चोंधे, राजु दुर्गे, आदेश नवले आदि मान्यवरांनी उपस्थिती लावली.
तत्पुर्वी दुपारच्या सत्रात उपांत्य फेरीचे सामने होवुन अंतिम सामना सायं. ७ वा पार पडला. आमदार चषक २०२१ स्पर्धेचे संयोजन शुभम ढाके, दर्शन महाजन, रविंद्र ढाके, कैलास रोटे, प्रदिप पटेल, शंकर पाटील, माऊली जगताप, योगेश महाजन, कुणाल इंगळे, भगवान निकम, दिपक महाजन, रुपेश पाटील, भुषण पाटील, वसंत नारखेडे, प्रदिप ढाके, संजय माळी, संदिप महाजन, एकनाथ सरोदे, प्रदिप नेहते यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *