पोस्टाच्या गुंतवणुकीत ४० टक्क्यांनी वाढ

३१ ऑक्टोबर २०२२

पिंपरी


गुंतवणुकीवर मिळणारे चांगले व्याज आणि गुंतवलेले पैसे सुरक्षित राहण्याची खात्री असल्यामुळे पिंपरी – चिंचवडकरांनी गुंतवणुकीसाठी पोस्टाला पसंती दिली आहे . गेल्या सहा महिन्यांत पोस्टाच्या गुंतवणुकीत ४० टक्के वाढ झाली आहे . पोस्टाच्या विविध योजनांमध्ये १ एप्रिल ते ३० सप्टेंबर २०२२ या सहा महिन्यांच्या कालावधीत ३८ हजार ९ ७० लोकांनी गुंतवणूक केली आहे . सीनिअर सिटीझन खात्यामध्ये २ हजार ५४४ जणांच्या ठेवी गेल्या सहा महिन्यांत शहरातील ३० पोस्ट ऑफिसमध्ये ३८ हजार ९ ७० जणांनी विविध योजनांमध्ये गुंतवणूक केली आहे . सीनियर सिटीजन खात्यामध्ये २ हजार ५४४ , रिकरिंग डिपॉझिटमध्ये १२ हजार ५ सेविंग खात्यामध्ये ४ हजार ६७३ , मुदत ठेवीत ६ हजार ९९ ५ , पब्लिक प्रोविडेंट फंडमध्ये ९ २५ लोकांनी गुंतवणूक केली आहे . मासिक उत्पन्न योजनेत ३ हजार १०१ , नॅशनल सेविंग सर्टिफिकेटमध्ये ५ हजार १३२ , किसान विकास पत्रात १२१६ नागरिकांनी गुंतवणूक केली आहे.

डाक घर बचत बँकेच्या माध्यमातून पोस्टाने बसवला जम कोरोना काळात सर्वकाही ठप्प झाले असताना पोस्टाने अधिक चांगली सेवा दिली . डाक घर बचत बँकेच्या माध्यमातून पोस्टाने आपला जम बसवला आहे . कोरोनाच्या काळापासून गुंतवणुकीसाठी लोक पोस्टाला अधिक पसंती देत आहेत . शहरात विविध ३० ठिकाणी असलेल्या पोस्ट ऑफिसमार्फत लोकांना चांगली सेवा दिली जात आहे . आकुर्डी , अॅम्युनिशन फॅक्टरी , औंध कॅम्प , भोसरी , भोसरी गाव , सीएमई , चिखली , चिंचवड ईस्ट , चिंचवडगाव , दापोडी बाजार , दापोडी , ईस्ट खडकी , एच . ए . फॅक्टरी , इंद्रायणीनगर , कासारवाडी , इन्फोटेक पार्क हिंजवडी , खडकी बाजार , खडकी , फुलेनगर , माण , मासुळकर कॉलनी , नेहरूनगर , प्राधिकरण , पिंपळे गुरव , पिंपरी कॉलनी , पिंपरी पीएफएसओ , पिंपरी वाघेरे , रुपीनगर , सांगवी , यमुनानगर याठिकाणी पोस्टाची ऑफिसेस आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *