गुळुंचवाडी येथे ट्रक,एसटी बस व दोन चारचाकी वाहनांचा विचित्र अपघात | ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात: ट्रकचालक फरार

बेल्हे दि.१८ (विभागीय संपादक रामदास सांगळे):- एसटी बस,ट्रक व दोन चार चाकी चा विचित्र अपघात गुळुंचवाडी (ता.जुन्नर) येथील गतिरोधकाजवळ झाला.या अपघातात एसटी बसमधील प्रवाशी किरकोळ जखमी झाले असून चारही वाहनांच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या बाबत आळेफाटा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की बुधवार (दि.१७) रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास कल्याण-नगर महामार्गारील गुळुंचवाडी येथे पारनेर-मुंबई एसटी बस नंबर (MH-14-BT 3219) ही पारनेर येथून मुंबई च्या दिशेने जात होती.बस स्पीड ब्रेकर उतरत असताना पाठीमागून ट्रक नंबर (MH-12 HD 1963) च्या चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव वेगात येऊन निशाण टेरेनो ( MH 46 B 9547) या चार चाकीला पाठीमागून धडक दिली.पुढे येऊन ट्रक ने एसटी बसला पाठीमागून जोरात धडक दिली. या मुळे एसटी बस उजव्या बाजूला जोरात फिरली गेली. त्यामुळे कल्याण च्या दिशेने नगर बाजूकडे जाणारी महिंद्रा XUV या चार चाकीची (MH 27 CQ 501) एसटी बसला धडक बसून त्या गाडीचे नुकसान झाले. या अपघातात एसटी बस चालक व प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. अपघात झाल्यावर ट्रक चालक पळून गेला आहे.( चालकाचे नाव, पत्ता समजू शकला नाही) आळेफाटा पोलिसांत ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून एसटी बस चालक शशिकांत थोरात यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास आळेफाटा पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *