खडकी टर्मिनल बाबत रेल्वे अधिकाऱ्यांची पाहणी

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१९ ऑक्टोबर २०२२


पुणे रेल्वे स्थानकावर येणारा वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी खडकी येथे नवीन टर्मिनल करावे, अशी सूचना खासदार गिरीश बापट यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना केली होती. त्यानुसार रेल्वे अधिकारी तसेच लष्करी अधिकाऱ्यांकडून खडकी रेल्वे स्थानकाची पाहणी करण्यात आली. मध्य रेल्वे बोर्डाचे जनरल मॅनेजर अनिल लाहोटी, प्रिन्सिपल चीफ ऑपरेशन्स मॅनेजर मुकुल जैन, मुख्य व्यवस्थापक मनजित सिंग, विभागीय रेल्वे व्यवस्थापिका रेणू शर्मा यांनी ही पाहणी केली.

पुणे रेल्वे स्थानकावरील भार कमी करण्यासाठी खासदार गिरीश बापट यांनी हडपसर रेल्वे स्थानकाचा विकास करणे तसेच खडकी येथे नवीन रेल्वे टर्मिनल तयार करणे हे उपाय सुचवले आहेत. याबाबत त्यांनी संसदेत मागणी करून केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पत्रव्यवहारही केला आहे. गेल्या महिन्यात रेल्वे अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीतही त्यांनी याबाबत प्रस्ताव सादर करण्याची सूचना केली होती.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *