चुलीत जाऊ द्या आमदारकी, डब्यात जाऊ द्या ती खासदारकी – नितेश राणे

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०२ नोव्हेंबर २०२२


भाजपा आमदार नितेश राणे यांनी चुलीत जाऊ द्या आमदारकी, डब्यात जाऊ द्या ती खासदारकी, कोण मोजत नाही, असं वक्तव्य केलं आहे. तसेच मी मरताना ते आमदार पद लागणार नाहीये. कोल्हापुरात लव्ह जिहादविरोधात हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी आमदार राणे बोलत होते.

आम्ही भाषणं देण्यासाठी इथं जमलेलो नाही. चुलीत जाऊ द्या आमदारकी, डब्यात जाऊ द्या ती खासदारकी, कोण मोजत नाही. मी मरताना ते आमदार पद लागणार नाहीये. मी मरताना एक हिंदू मेला असं ते लोक सांगणार आहेत. म्हणून हिंदू म्हणून तुम्ही कसे जगणार आहात, हिंदू म्हणून आपल्या धर्माचं कसं रक्षण करणार आहात हे आज ठरवण्याची गरज आहे,असं मत नितेश राणे यांनी व्यक्त केलं.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *