महाविकास आघाडीला चॅलेंज करणारे मोहित कंबोज कोण आहे?

अतुल परदेशी
मुख्य संपादक
२० ऑगस्ट २०२२


शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोहित कंबोज यांचा उल्लेख केला होता.मोहित कंबोज हे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे फ्रंटमॅन आहेत असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. मोहित कंबोजने पत्रा चाळीत स्वत: जमीन विकत घेतली आहे असंही ते म्हणाले होते.क्रूझ ड्रग केसमध्ये आर्यन खान आणि इतर आरोपींची अटक आणि जामिनावर सुटका झाली असली तरी हे प्रकरण इथेच थांबलं नाही. यात दररोज नवे आरोप समोर येत आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांच्यानंतर आता या प्रकरणात भाजप युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष कंबोज यांनी उडी घेतली आहे.

मोहित कंबोज कोण आहेत?

आर्यन खान हे प्रकरण अपहरण आणि खंडणीचं आहे असा दावा नवाब मलिक यांनी केला असून या प्रकरणाचा सूत्रधार मोहित कंबोज आहे असा आरोपही त्यांनी केला आहे. मोहित कंबोज यांनी हे आरोप फेटाळले आहेत.याउलट मोहित कंबोज यांनी सुनील पाटील हा या प्रकरणाचा मास्टरमाईंड असून नवाब मलिक याच्याशी त्याचे संबंध आहेत असा आरोप केला आहे.आर्यन खान प्रकरण अपहरण आणि खंडणीचं आहे असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. या प्रकरणाचा सूत्रधार मोहित भारतीय कंबोज आहेत असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.

भाजपचा कार्यकर्ता मोहित कंबोज याच्या मेहुण्याच्या माध्यमातून आर्यन खानला क्रूझवर नेलं असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले, “मोहित कंबोजच्या मेहुण्याच्या माध्यमातून सापळा रचण्यात आला. अपहरण करून 25 कोटी रुपये मागण्याचा खेळ सुरू झाला. 18 कोटी रुपयांची डील झाली. 50 लाख रुपये घेण्यात आले. परंतु एका सेल्फीने खेळ उघड झाला हे खरं आहे.”मोहित कंबोज आणि समीर वानखेडे यांचे चांगले संबंध असल्याचंही ते म्हणाले. 7 ऑक्टोबरला कंबोज आणि समीर वानखेडे ओशीवारा कब्रस्तान येथे भेटल्याचा दावा मलिक यांनी केला आहे. या दोघांच्या बैठकीचा व्हीडिओ आम्ही लवकरच जारी करणार असल्याची घोषणा मलिक यांनी केला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *