पुण्यासाठी दाखवलेला समंजसपणा मुंबईसाठीही दाखवा, किशोरी पेडणेकर यांचा फडणवीसांना सल्ला

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१९ ऑक्टोबर २०२२


पुण्यामध्ये सोमवारी झालेल्या मुसळधार पावसावरुन राजकीय नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. पावसामुळे झालेल्या नुकसानावरुन महानगरपालिकेत सत्ता असलेल्या भाजपावर जोरदार टीका करण्यात येत आहे. बाबत विचारलं असता “पाऊस किती पडावा हे महानगरपालिका ठरवत नाही” अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. या वक्तव्यावरुन ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीसांचा हा समंजसपणा मुंबईमध्ये मुसळधार पावसानं पाणी साचल्यानंतर कुठे जातो? असा सवाल पेडणेकर यांनी केला आहे.

पुण्याची सत्ता भाजपाकडे आहे, तर मुंबईची सत्ता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाकडे आहे. मग दोन्ही ठिकाणी वेगळा न्याय का?” अशी विचारणा पेडणेकर यांनी केली आहे. पावसाळ्यात उद्धव ठाकरेंवर घणाघाती आरोप करण्यात येतात, तेव्हा फडणवीस समंजसपणा का दाखवत नाहीत, असेही त्यांनी म्हटले आहे. पुण्यासाठी दाखवलेला समंजसपणा मुंबईसाठीही दाखवा, असा सल्ला पेडणेकरांनी फडणवीसांना दिला आहे.पाऊस कधी पडावा, कसा पडावा, किती मिलीमीटर पडावा, हे 100 टक्के आपल्या हातात नसल्याचंही पेडणेकर यांनी म्हटलं आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *