We Love Shirur व सह्याद्री प्रतिष्ठान ची कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना अनमोल मदत…परिस्थिती कशीही असो, समाजहितासाठी अहोरात्र झटत राहा : युवराज शहाजीराजे भोसले, कोल्हापूर

बातमी : विभागीय संपादक, रविंद्र खुडे.
शिरूर : दि. १३ ऑगस्ट २०२१.

     कोल्हापूरचे युवराज, कुमार शहाजीराजे संभाजीराजे भोसले (छत्रपती), यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन, सह्याद्री प्रतिष्ठान शिरूर व वुई लव शिरूर यांच्या वतीने, शिरूर शहरातून मदत जमा करुन, कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील शेणगाव, आकुर्डे, गारगोटी, शिसेवाडी, एरंडपे, धनगरवाडा, वासनोली, जोगेवाडी, तिरवडे, आंबेडकरनगर, चिक्केवाडी आदी पूरग्रस्त भागातील लोकांना अन्नधान्य, कपडे व जीवनावश्यक वस्तू, अशा सुमारे ३५० किटचे वाटप करण्यात आले.
       यासाठी शिरूर येथील कृणाल काळे, उमेश शेळके, भूषण खैरे, प्रशांत शिंदे, योगेश फाळके, विकास सांबारे, पराग खराडे, रामराज गवारे, अजिंक्य महाजन, सागर परभने, अक्षय ढमढेरे, कौस्तुभ घोगडे, आकाश चाकणे, प्रतिक काशिकर, रोहित सोनावणे, सागर साठे, यश धानी या ‘We Love Shirur’ ग्रुप च्या तरुणांनी या सत्कार्यात आपले अमूल्य योगदान देत, खऱ्या गरजवंत पूरग्रस्तांना ही मदत प्रत्यक्ष नेऊन दिली.

      युवराज कुमार शहाजीराजे संभाजीराजे भोसले छत्रपती, यांनी यावेळी सर्व तरुण मावळ्यांना प्रत्यक्ष भेटून, सर्वांशी संवाद साधत व  वैयक्तिक विचारपूस करत मार्गदर्शन केले. सर्व तरुणांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत, मोलाचे मार्गदर्शन करताना सांगितले की, “परीस्थिती कशीही असो, समाज हितासाठी अहोरात्र झटत रहा, गडकोट, किल्ले आणि दुर्गसंवर्ध, यासाठी कसलीही मदत लागली तर हक्काने सांगा” असा शब्द यावेळी युवराजांनी दिल्याची माहिती, कृणाल काळे व ‘We Love Shirur’ ग्रुप च्या तरुणांनी, आपला आवाज न्यूज नेटवर्कशी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *