शरद पवार, उद्धव ठाकरेंनी स्वीकारलं भारत जोडो यात्रेचं निमंत्रण

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१८ ऑक्टोबर २०२२


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारत जोडो यात्रेचेनिमंत्रण स्वीकारले आहे. हे दोन्ही नेते भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती काँग्रेस नेत्यांनी सांगितली आहे. ही यात्रा पुढील महिन्यात (नोव्हेंबर) महाराष्ट्रात दाखल होणार आहे.

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात आणि मुंबई विभागीय काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते अमरनाथ राजूरकर यांनी आज एका शिष्टमंडळासह मातोश्रीवर उद्धव ठाकरे तर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे शरद पवार यांची भेट घेऊन भारत जोडो यात्रेचं निमंत्रण दिलं होतं. शरद पवारांसह उद्धव ठाकरेंनी भारत जोडो यात्रेचं निमंत्रण स्वीकारलं असून दोन्ही नेते भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *