जुन्नर तालुक्यात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या वतीने ५० हजार लसीकरण कार्यक्रमाचा शुभारंभ. वारूळवाडी येथील ठाकरवाडीपासून लसीकरणास प्रारंभ.

किरण वाजगे
कार्यकारी संपादक
२३ ऑक्टोबर २०२१

नारायणगाव


संसद रत्न खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या माध्यमातून त्यांच्या वाढदिवसानिमित्त जगदंब प्रतिष्ठान यांच्या वतीने तसेच सिरम इन्स्टिट्यूट, नोबेल हॉस्पिटल पुणे, जिल्हा परिषद पुणे, यांच्या सहकार्याने शिरूर लोकसभा मतदारसंघात ५ लाख कोव्हीशील्ड लसी देण्यात येत आहेत. हडपसर, भोसरी, खेड, शिरूर, आंबेगाव या मतदार संघात या मोफत लसीकरण मोहिमेला यापूर्वीच सुरुवात झाली आहे.

या अनुषंगाने जुन्नर तालुक्यात आज वारूळवाडी येथील ठाकरवाडीपासून या मोहिमेचा शुभारंभ झाला.

याप्रसंगी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, युवा नेते अमित बेनके, सुजित खैरे, उद्योजक संजय वारुळे, माजी जिल्हा परिषद सदस्य मारूती काळे, वारूळवाडी गावचे सरपंच राजेंद्र मेहेर, उपसरपंच माया डोंगरे, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ वर्षा गुंजाळ, माजी सरपंच जंगल कोल्हे, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, रमेश मेहेत्रे, विलास पानसरे, सचिन वारुळे, गणेश वाजगे, जयेश कोकणे, आशिष हांडे, अविनाश घोलप, ज्योती संते, अंगणवाडी सेविका, तसेच आशा वर्कर, शिक्षक व्रूंद व ग्रामस्थ उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *