सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर सह जिल्हापरिषद माजी सदस्य दिनकर पंधरकर, प्रमोद जगताप, सुरेश भापकर यांना पाणी आंदोलन केल्याने अटक…

रोहित खर्गे,
विभागीय संपादक

श्रीगोंदा :- दि १६ एप्रिल २०२१
कुकडीच्या हक्काच्या पाण्यासाठी कुकडी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणारे श्रीगोंद्याचे भूमिपुत्र पिंपरी चिंचवडचे सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांच्यासह श्रीगोंद्याचे माजी जिल्हापरिषद सदस्य दिनकर पंधरकर, प्रमोद जगताप, सुरेश भापकर यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना श्रीगोंदा पोलिसांनी कारवाई करत अटक केली आहे.

त्यांच्यावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांचे जमावबंदी, संचारबंदी नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी नियमांचे पालन न केल्यामुळे गुन्हा दाखल करून अटक केलीय.
सामाजिक कार्यकर्ते यांच्या या आंदोलनास सामाजिक काम करणाऱ्या कष्टकरी व विविध चळवळीत काम करणाऱ्या कामगार , शेतकरी , कष्टकरी नेत्यांनी पाठिंबा जाहीर केला होता.


मारुती भापकर आपला आवाजकडे बोलताना म्हणाले डिंभे माणिकडोह जोड बोगद्याचे काम आणि कुकडी चे आवर्तन मे ऐवजी २५ एप्रिल ला सोडावे म्हणजे पिके जळून जाणार नाहीत, शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी माफक अपेक्षाही पूर्ण करू शकले नाही. आम्ही जमावबंदीचे नियम मोडले नाही तरीही पोलिसांनी आमची मुस्कटदाबी करून अटक केलीय. आमच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर भविष्यात आम्ही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या घरासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा मारुती भापकर यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *