NIA ची कारवाई, देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१८ ऑक्टोबर २०२२


राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएने मंगळवारी उत्तर भारतात वेगवेगळ्या ५० पेक्षा जास्त ठिकाणांवर छापेमारी केली आहे. स्थानिक गुन्हेगारी टोळींचे वाढते प्रस्थ रोखण्यासाठी तसेच दहशतवाद्यांशी त्यांच्या कथित संबंधाची चौकशी करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.

नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) ने मंगळवारी दहशतवादी आणि ड्रग्ज तस्कर यांच्यातील संबंधाविरोधात मोठी कारवाई केली. एनआयएने दहशतवादी संबंधांबाबत देशभरातील अनेक गुंडांच्या लपलेल्या ठिकाणांवर छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि दिल्ली-एनसीआर प्रदेशात आज दहशतवादी, गुंड आणि अंमली पदार्थांचे तस्कर यांच्यातील संबंध तोडण्यासाठी अनेक ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत. स्थानिक गुन्हेगार, गुन्हेगारी टोळी यांचा दहशतवाद्यांशी असलेला संबंध तसेच ड्रग्ज तस्करी यांचे पसरलेले जाळे रोखण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *