अखिल भारतीय विद्यार्थी परीषदेचे ५५ वे ‘महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन’ उद्योग नगरी पिंपरी-चिंचवड मध्ये…..

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी :दि ३० जानेवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) ही गेली ७२ वर्ष शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात अविरतपणे कार्यरत असलेले जगातली सर्वात मोठी विद्यार्थी संघटना आहे.

विद्यार्थी हा उद्याचा नाही आजचा नागरिक आहे. संघटन बंधनातून राष्ट्रहितासाठी झटणारे विद्यार्थी घडवणे हे ध्येय ठेवून अभाविप गेली ७२ वर्ष कार्यरत आहे. विविध कार्यक्रम, एकत्रीकरण, अभ्यास वर्ग, आंदोलने, अधिवेशन यातून हे साध्य होत असते.

पिंपरी चिंचवड हे औद्योगिक शहर म्हणून प्रसिद्ध आहे. या शहरात श्रमिक वर्ग आणि उद्योजक वर्ग मोठा आहे. येथे शिक्षण घेणारा विद्यार्थी वर्ग सदैव देशप्रेम आणि एकतेच्या अखंड धारेतून बाहेर पडू नये,विद्यार्थ्यांचा उत्कर्ष व्हावा, त्यांनी समाजात पत प्रतिष्ठा मिळवावी; मात्र योग्य वेळी देशासाठी एकत्र यायला, ज्ञानार्जनासाठी त्यांनी सदैव तत्पर राहावे, त्यांनी चारित्र्य (शील) घडवावे आणि राष्ट्र ऐक्यात सामील व्हावे. यासाठी अभाविप आग्रही भूमिकेत आहे. त्या दृष्टिकोनातून येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन हे अभाविप पिंपरी चिंचवड करत आली आहे. महापुरुषांच्या जयंती निमित्त एकत्रीकरण प्रबोधन, विविध चर्चासत्रांचे आयोजन, लेखन स्पर्धा या पिंपरी चिंचवड अभाविप तर्फे होत असतात.
अभिवपच्या स्थापणे नंतर आपल्या पिंपरी-चिंचवड शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन’ होत आहे त्यामुळे अधिवेशनाचे एक वेगळेच महत्व आहे.
चिंचवड मधील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात होत असलेल्या या अधिवेशनात ‛आत्मनिर्भर भारत’ आणि ‛राष्ट्रीयशिक्षा नीती’ हा या अधिवेशनाचा प्रमुख विषय आहे.
या ५५ व्या प्रदेश अधिवेशनाचे उदघाटक म्हणून केंद्रीय पर्यावरण व वन मंत्री मा.श्री प्रकाश जावडेकर असतील.
या अधिवेशनाच्या स्वागत समिती अध्यक्ष म्हणून मराठा काॅमर्स आॅफ चेंबर्सचे अध्यक्ष श्री सुधीर मेहेता असतील तर बालाजी शैक्षणिक संस्थेचे संचालक श्री परम बालसुब्रमन्यम् हे उपाध्यक्ष तसेच अभाविपचे पूर्व कार्यकर्ते ॲड.श्री.मोरेश्वर शेडगे हे सचिव असतील.
तसेच शहराच्या प्रथम नागरिक मा. महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्यासह समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रतिष्ठीत व्यक्ती या स्वागत समितीचे सदस्य असणार आहेत.
अधिवेशनाचे स्वागत समिती संरक्षक अभाविप चे पूर्व कार्यकर्ते पद्मश्री श्री. गिरीश प्रभुणे असतील