लोकशाहीर साहित्यरत्न अण्णांभाऊ साठे यांच्या १०१ व्या जयंती निमित्त पेठ येथे फळझाडांचे वृक्षारोपण… युगप्रवर्तक प्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य व राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागा मार्फत कार्यक्रमाचे आयोजन…

आंबेगाव : –
आंबेगाव ब्युरोचिफ
मोसीन काठेवाडी

युगप्रवर्तक प्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य व राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग आंबेगाव तालुका आणि अनु जाती व नवबौद्ध मुलांची निवासी शाळा पेठ ता आंबेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने  लोकशाहीर साहित्यरत्न अण्णांभाऊ साठे यांच्या १०१ व्या जयंती चे आयोजन करणयात आले होते.

या वेळी सकाळी प्रतिमेचे पूजन व पुष्पहार आंबेगाव भूषण पुरस्काराचे मानकरी  आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुका सरचिटणीस  मा रामदास जाधव युगप्रवर्तक प्रतिष्ठाण चे अध्यक्ष  गौतमराव खरातआणि  राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग चे माजी जिल्हाध्यक्ष मा गौतमराव रोकडे   यांच्या हस्ते करण्यात आले या नंतर  साहित्यरत्न अण्णांभाऊ साठे यांच्या कार्या विषयी सर्वच मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली त्या नंतर अनु जाती व नवबौद्ध मुलांची निवासी शाळा च्या मैदानात आंबा,पेरू,चिकू,अंजीर,नारळ सीताफळ,विलायची, आवळा, मोसंबी,सफरचंद अशी २०० फळझाडांचे  वृक्षारोपण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी  आंबेगाव तालुका राष्ट्रवादीचे सरचिटणीस रामदास जाधव,युगप्रवर्तक प्रतिष्ठाण चे  संस्थापक गौतमराव खरात शाळेच्या मुख्यध्यापिक श्रीम विमल खाडे मॅडम राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्यायचे मा जिल्हाध्यक्ष गौतमराव रोकडे  जिल्हा युवक उपाध्यक्ष नवीन सोनवणे ,आंबेगाव तालुका युगप्रवर्तक प्रतिष्ठाण संचलित भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मोहत्सव कमिटीचे  अध्यक्ष अमित्तजी रोकडे ,युवती अध्यक्ष कु सारिका वाघमारे जयंती कमिटीचे खजिनदार शँकर  सोनवणे मंचर शहर अध्यक्ष व पंचशील प्रतिष्ठाण चे अध्यक्ष संतोषजी देठे सामाजिक कार्यकर्ते सुभाष रोकडे ,जधाव सर शामराज मॅडम ,जाधव मॅडम  पेठ गावचे संतोष रोकडे पत्रकार समीर गोरडे आदी मान्यवर उपस्थित होते या  प्रसंगी शाळेच्या मुख्यध्यापिक श्रीम विमल खाडे यांनी युगप्रवर्तक संस्थेच्या माध्यमातून  पेठ शाळेत सन २०१५ पासून ज पर्यंत गेली ७ वर्षे पासून दरवर्षी  १०० ते१५० झाडांचे वृक्षारोपण केले जाते  व  शाळा  प्रशासन त्या झाडांचे संगोपन  करते म्हणून या उजाड  माळरान हिरवेगार झाले आहे  संस्थेचे कार्य कौतुकास्पद असून संस्थेचे अनेक प्रकारे शाळेला सहकार्य असते
प्रास्तविक मुख्यध्यापिका  श्रीम विमल  खाडे यांनी केले सूत्रसंचालन श्री जाधव सर यांनी केले तर आभार श्रीम शामराज मॅडम यांनी मानले…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *