रोहित पवार यांचा शिंदे सरकारला टोला

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१५ ऑक्टोबर २०२२


दसऱ्या मेळाव्यानंतर आता ठाण्यातील दिवाळी पहाट कार्यक्रमावरून पुन्हा शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा संघर्ष सुरू होण्याची शक्यता आहे. दरम्यान, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी शिंदे गटाला टोला लगावला आहे.

दसरा मेळाव्याच्या वेळीही शिंदे गटाने शिवाजी पार्क मैदानासाठी हट्ट धरला होता. त्यावेळी त्यांनी मोठ्या मनाने उद्धव ठाकरे यांना दसरा मेळावा घेऊ द्यायला हवा होता. मात्र, हे प्रकरण न्यायालयात गेलं. अंधेरी निडवणुकीच्या उमेदवारीवरूनही त्यांनी हाच प्रकार केला. अखेर न्यायालयाने ठाकरे गटाच्या बाजुने निकाल दिल्यानंतर ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला.

मात्र आता दिवाळी पहाट कार्यक्रमासाठीही न्यायालयात जावं लागेल की काय, अशी परिस्थिती आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टीसाठी जर न्यायालयात जावं लागत असेल, तर जनता निडणुकीच्या माध्यमातून त्यांना उत्तर देईल. मोठ्या मनाचे लोक निवडून येतील आणि सारखं आडवाआडवीचे काम करणाऱ्यांचा पराभव होईल”, असा टोला रोहित पवार यांनी शिंदे सरकारला लगावला आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *