डॉ कथे डायग्नोस्टिक सेंटरच्या राजगुरूनगर शाखेचा उद्घाटन समारंभ २० ऑगस्ट रोजी आमदार दिलीप मोहिते आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते होणार उद्घाटन…

नारायणगाव
रेडिओलॉजी क्षेत्रात उत्तर पुणे जिल्ह्यात अग्रेसर ठरलेल्या डॉ. कथे डायग्नोस्टिक सेंटर च्या खेड तालुक्यातील राजगुरुनगर शाखेचा उद्घाटन समारंभ शुक्रवार दिनांक २० रोजी सकाळी दहा वाजता आमदार दिलीप मोहिते-पाटील, आमदार अतुल बेनके व खेड तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष हरिभाऊशेठ सांडभोर यांच्या हस्ते होणार आहे. अशी माहिती डॉ. कथे डायग्नोस्टिक सेंटर चे डायरेक्टर डॉ पंजाबराव कथे व डॉ पिंकी कथे यांनी दिली.
यानिमित्ताने डॉ. कथे डायग्नोस्टिक सेंटरच्या राजगुरुनगर शाखेच्या उद्घाटनानिमित्त रोटरी क्लब राजगुरुनगर व रोटरी क्लब नारायणगाव हायवे तसेच लोकमान्य हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, रोटरीचे प्रांतपाल पंकज शहा, राजगुरुनगर सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र वाळुंज, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विनायकराव घुमटकर यांच्या हस्ते होणार आहे.


या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्य बी आर काळे, खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र बुट्टे पाटील, उपाध्यक्ष प्रताप टाकळकर, मनसेचे जिल्हाप्रमुख समीर थिगळे, नगराध्यक्ष बापू थिगळे, डॉ महेशकुमार टाकळकर, डॉ प्रदीप शेवाळे, तज्ञ डॉक्टर प्रीतम तितर, डॉ. रूपाली टाकळकर, दादा इंगवले, किरणदादा आहेर, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात पॅथॉलॉजी तपासणी, हिमोग्राम, बीएसएल रँडम शुगर टेस्ट, अस्थीरोग : मणक्याचे आजार, गुडघेदुखी, मानदुखी, कंबर दुखी, खांद्याचे विकार, स्त्रीरोग, कर्करोग, स्त्रियांच्या सर्व प्रकारच्या समस्या, नाक-कान-घसा, कान खाजणे, बहिरेपणा, कान वाहणे, नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया, हृदयरोग तपासणी आदी तपासण्या मोफत होणार आहेत.
दरम्यान शिबिरात भाग घेणाऱ्या पेशंटसाठी कथे डायग्नोस्टिक सेंटर च्या वतीने खेड येथे प्रत्येक तपासणीवर ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. तरी या शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ पिंकी पंजाबराव कथे यांनी केले आहे.
सोळा वर्षापुर्वी डॉ कथे डायग्नोस्टिक सेंटरची नारायणगाव येथे उभारणी करण्यात आली असून आजतागायत जुन्नर तालुक्यातील नारायणगाव सह जुन्नर, आळेफाटा, आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे डॉ कथे डायग्नोस्टिक सेंटर च्या शाखा सुरू करण्यात आल्या आहेत तसेच लवकरच शिरूर शहरात नव्याने सेंटर सुरू करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *