१५ ऑक्टोबर २०२२
भोसरी
दिवाळी म्हटले की महिलांमध्ये घराच्या आवराआवरी पासून ते आंगणातील रांगोळी पर्यंत सर्व तयारी सुरू असल्याचे दिसते…दिवाळी सणानिमित्ताने आपला आवाज आपली सखी व राजमाता जिजाऊ महिला महासंघ च्या वतीने भोसरी येथे शनिवार दि.15 ऑक्टोबर रोजी फ्युजन रांगोळी वर्कशॉप चे आयोजन आपला आवाज आपली सखी सभासद व भोसरी परिसरातील महिलांसाठी करण्यात आले होते.
कैलासवासी धोंडिबा फुगे,क्रीडा संकुलं विरंगुळा केंद्र भोसरी येथे आपला आवाज आपली सखी च्या संचालिका संगीता तरडे व राजमाता जिजाऊ महिला महासंघ अध्यक्षा वैशाली गव्हाणे फ्युजन रांगोळी ट्रेनर रूपाली पडलीकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली.यावेळी नयना फुगे,चंद्रकला गव्हाणे,माधुरी जद, मनीषा डफळ,स्मिता खरात,नम्रता निकम या मान्यवर महिला उपस्थित होत्या.
या रांगोळी वर्कशॉपमध्ये थ्रीडी,कॉर्नर डेकोरेशन,ट्रेनिसल, पैठणी पल्लू, एम्बॉस अशा विविध प्रकारच्या रांगोळ्या रुपाली पडलीकर यांनी महिलांना रांगोळी काडून समजावून सांगितले आहे,रुपाली पडलीकर हे वर्कशॉप घेण्यासाठी नागपूर हुन आल्या होत्या,त्यांचे आता पर्यंत 100 च्या वर वर्कशॉप घेण्यात आले,या वर्कशॉप चा लाभ घेण्यासाठी विविध भागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित झाल्या होत्या,आजच्या धका धकीच्या जीवनात अगदी कमी वेळात,सुलभ व सुंदर रांगोळी काढण्याची कला आज आम्हाला अवगत झाली अशी भावना महिलांनी व्यक्त करत,आपला आवाज आपली सखी व राजमाता जिजाऊ महिला महासंघ यांनी आयोजित केलेल्या उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन निशा निमसे यांनी केले.