शिंदे गटातील काही आमदार नाराज; अजित पवारांच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटील यांचं प्रत्युत्तर

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१५ ऑक्टोबर २०२२


राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे गटातील आमदारांबाबत एक सुचक वक्तव्य केलं आहे. शिंदे गटातील आमदार नाराज असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. काही दिवसात खरं, खोटं काय ते समोर येईल, असे पवार म्हणाले आहेत. दुसरीकडे शिंदे गटातील सर्व आमदारांची मंत्रिपदाची मागणी आहे. त्यामुळे सरकार टिकणं कठिण असल्याचे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या या वक्तव्यावर भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

राज्यात शिंदे-फडणवीस सरकारच्या स्थापनेला १०० दिवस झाले आहेत. स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून अजित पवार याबाबत भाष्य करत आहेत. मात्र अजुनपर्यंत काहीही झालेलं नाही असा टोला पाटील यांनी लगावला आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *