योगजागृती आणि एकतेचा संदेश देत देहूगावातील तरुणीची बारा ज्योतिर्लिंग सायकल यात्रा

दि. १४/०१/२०२३

पिंपरी

 

पिंपरी : देहूगाव येथील 28 वर्षीय पूजा तानाजी बुधावले हिने 85 दिवसांमध्ये आठ हजार किलोमीटर सायकल चालवून बारा ज्योतिर्लिंग सायकल यात्रा पूर्ण केली आहे. सायकल यात्रेदरम्यान योग मेरा कर्म है एकता मेरा धर्म है या संकल्पने द्वारे जनजागृती करत प्रत्येक जाती धर्माचा व्यक्ती योग करू शकतो योगाचे फायदे होत असतात असा योगजागृती आणि एकतेचा संदेश दिला आहे.

पूजा बुधावले ही खेळाडू आहे.धावणे, सायकलिंग,स्विमिंग हे तिचे छंद आहेत. ती योगशिक्षिका आहे.योगप्रचारासाठी तिने बारा ज्योतिर्लिंग दर्शन घेत भारतातील आठ राज्यातून ८ हजार किलोमीटर सायकल यात्रा ८५ दिवसात पूर्ण केला.तिने सायकलयात्रेची सुरुवात ८ ऑक्टोबर रोजी केदारनाथ येथून केली होती.त्यानंतर उत्तर प्रदेश काशी विश्वनाथ,मध्य प्रदेश ओंकारेश्वर आणि उज्जैन,गुजरात मधील सोमनाथ ज्योतिर्लिंग,महाराष्ट्र मधील पाच ज्योतिर्लिंग परळी वैजनाथ,औंढा नागनाथ,त्रंबकेश्वर,भीमाशंकर आणि घृष्णेश्वर, तेलंगणा राज्य पार करून आंध्र प्रदेशातील श्रीशैल्यम-मल्लिकार्जुन स्वामी आणि तमिळनाडू – रामेश्वरम ज्योतिर्लिंग येथे ३१ डिसेंबर रोजी सायकल यात्रा पूर्ण केली.

समाजामध्ये योगा जागृक्ता आणि एकतेचा संदेश हा यात्रेचा उद्देश होता त्यासाठी “योग मेरा कर्म है एकता मेरा धर्म है” या संकल्पनेतून जनजागृती करत ठीकठिकाणी शाळा,विद्यालयामध्ये योगाचे प्रशिक्षण देत योग जागरूकता तसेच एकतेचा संदेश सायकलपटू पूजा बुधावले हिने दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *