3 नोव्हेंबरला अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१५ ऑक्टोबर २०२२


भारत निवडणूक आयोगाने 166 – अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक जाहीर केली आहे. या पोटनिवडणुकीसाठी दि. 3 नोव्हेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे. या अनुषंगाने जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात मतदानाच्या दिवशी म्हणजे दिनांक 3 नोव्हेंबर 2022 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून ऋतुजा रमेश लटके यांनी उमेदवारी अर्ज भरला, तर भाजपतर्फे मुरजी पटेल यांनी अर्ज भरला आहे. ही सार्वजनिक सुट्टी ‘१६६ – अंधेरी पूर्व’ या मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी अंधेरी मतदार संघांच्या बाहेर असतील, त्यांना देखील लागू असल्याचे आदेशित करण्यात आले आहे. तसेच केंद्र शासनाची शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका इत्यादींना ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *