रोहित खर्गे
विभागीय संपादक
पिंपरी : दि १ फेब्रुवारी २०२१
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाचा केंद्रबिंदू हा सामान्य नागरिक ठेवला आहे. त्यांच विचाराने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. महाराष्ट्रासाठी नाशिक मेट्रोसाठी २०९२ कोटी रुपये आणि नागपूर मेट्रोसाठी ५ हजार ९७६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच पेपरलेस बजेट सादर करण्यात आले. सर्वसामान्य नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करुन देण्यासाठी ३५ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यासाठी अर्थमंत्र्यांनी ‘आत्मनिर्भर स्वस्थ भारत’ या योजनेची घोषणा केली आहे.
यासह आयकर संरचनेमध्ये कोणतीही वाढ केलेली नाही. विशेष म्हणजे, ‘एनआरआय’ नागरिकांना दुहेरी करप्रणालीतून दिलासा मिळाला आहे. टॅक्स ऑडिटची मर्यादा १० कोटी रुपयांपर्यंत केली आहे. देशातील गुंतवणूक वाढावी. यासाठी कॉर्पोरेट करात कपात केली आहे. ७५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांची पेन्शनच्या उत्पन्नावर रिटर्न भरण्याची गरज नाही. भारत स्वंतत्र झाल्यानंतर पहिली डिजिटल जणगणना करण्यात येणार आहे. सर्व क्षेत्रांमध्ये किमान वेतन कायदा लागू करण्यात येणार आहे. १०० नवे सैनिक स्कूल उभारण्याचा संकल्प केंद्र सरकारने केला आहे. असंघटित मजुरांसाठी ऑनलाईन पोर्टल, शेतीमालासाठी दीडपट हमीभाव, ग्रामीण भागाच्या विकासासाठी तब्बल ४० हजार कोटींची तरतूद, सिंचनासाठी १० हजार कोटी रुपयांची तरतूद, परवडणाऱ्या घरांच्या योजनांसाठी मुदतवाढ, सोन्यावरील शुल्क कपात, भारतातील प्रमुख भाषांमध्ये इंटरनेटवर माहितीची सुविधा, उज्ज्वला योजनेत आणखी एक कोटी लाभार्थींचा समावेश, यासह आरोग्य, संरक्षण, उत्पादन आदी क्षेत्रांसाठी केंद्र सरकारने भरघोस मदत केली आहे. त्यामुळे देशातील सर्वच घटकांतील नागरिकांना ‘आत्मनिर्भर’ बनवणारा हा अर्थसंकल्प आहे. असे भोसरी चे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.