शिंदे-फडणवीस सरकारचा एकनाथ खडसेंना दणका; वाय दर्जाची सुरक्षा काढली

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१५ ऑक्टोबर २०२२


राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना शिंदे-फडणवीस सरकारने दणका दिला आहे. एकनाथ खडसे यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्याबाहेर गुरुवारी रात्रभर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनानंतर एकनाथ खडसे यांना गृह खात्याने झटका दिला आहे. एकनाथ खडसे यांना दिलेले विशेष सुरक्षा कवच गृह खात्याने काढून घेतले आहे. त्यांना १९९१ पासून ही सुरक्षा पुरवली जात होती.

याबाबत एकनाथ खडसे म्हणाले की, जळगाव शहर पोलीस ठाण्याबाहेर मी रात्रभर धरणे आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हस्तक्षेप केल्यानंतर आपण आंदोलन मागे घेतले. त्यानंतर माझी सुरक्षा काढून घेण्यात आल्याचे मला लक्षात आले. पोलिसांची सुरक्षा असो वा नसो. पण सरकारविरोधात माझं आंदोलन सुरूच राहील, असा इशारा एकनाथ खडसे यांनी दिला आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *