उद्धव ठाकरे यांना मतदान करणं म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाला मत देणं – चंद्रशेखर बावनकुळे

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१५ ऑक्टोबर २०२२


उद्धव ठाकरे यांना मतदान करणं म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मतदान करण्यासारखं असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

बावनकुळे म्हणले, आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीतील पक्षांचे हाल झाले पाहिजेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीत ‘घड्याळ’ थांबवायचं, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा मतदारसंघ असलेल्या भंडारा जिल्ह्यातील साकोलीमध्ये ‘पंजा’ थांबवायचा, आणि वरळीतील समुद्राचे पाणी घेऊन ‘मशाल’ विझवायची . या मशालीने सोनिया गांधी राहुल गांधी यांचे विचार स्वीकारले, भारत जोडो यात्रेत सहकार्य केलं, काँग्रेसची संस्कृती विरासत स्वीकारली, वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसला अडीच वर्ष साथ दिली, हिंदुत्व आणि मराठी माणसांचा विचार न करता काँग्रेस-राष्ट्रवादीची मदत घेतली. मशालीची पकड काँग्रेसच्या हातात आहे आणि त्या हाताला घड्याळ आहे, असं बावनकुळे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांना मत देणं म्हणजे काँग्रेसला मत देण्यासारखं आहे. उद्धव ठाकरे यांना मत देणं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला मत देण्यासारखं आहे, असा निशाणाही बावनकुळे यांनी साधला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *