‘शेंबडा मुलगा’ उल्लेख करत नारायण राणेंचा आदित्य ठाकरेंना टोला

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१५ ऑक्टोबर २०२२

मुंबई


केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंना भाषा सुधारण्याचा सल्ला देताना आधी मातोश्रीवरुन बाहेर निघा आणि मग आव्हान द्या असा टोला नारायण राणेंनी लागवला. तसेच आदित्य ठाकरे यांचा उल्लेख शेंबडा मुलगा असा केला.

अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमधील सर्व पक्षांचे नेते एकत्र आले होते. त्यावर राणेंनी सगळे एकत्र आले म्हणजे शक्ती तयार होत नाही, असा टोला लगावला. तसेच त्या लोकांमध्ये मतभेद आहेत, असा दावाही राणेंनी केला. ज्यांमध्ये शक्ती नसते ते असे एकत्र येऊन दाखवतात की आम्हाला उब मिळालीय आमच्यात शक्ती आली आहे, असंही राणे म्हणाले. त्याचप्रमाणे शक्ती ही भाजपाकडे असल्याचं राणेंनी यावेळी म्हटलं. देशात भाजपाची सत्ता आहे. राज्यात भाजपाची सत्ता आहे. देशातील जास्तीत जास्त राज्यांमध्ये आमची सत्ता आहे, असं राणेंनी म्हटलं.

नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरेला भाषा सुधरायला सांगा. हिंमत असेल तर मैदानात येऊन दाखवा. हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा. आता आम्ही पाडलं ना सरकार. आता म्हणे मैदानात या. आम्ही मैदानातच आहोत. ‘ मातोश्री सोड तरी, मातोश्रीचा दरवाजा उघडून बाहेर तरी बघ ना जग कसं आहे. उद्धव ठाकरेने उगाच बडबड करु नये,असं राणे म्हणाले.आदित्य ठाकरेंचं नाव घेत प्रश्न विचारल्यावर कसला आदित्य शेंबड्या मुलांचे प्रश्न मला विचारता,असं नारायण राणे म्हणाले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *