एसटी महामंडळाकडून प्रवास भाड्यात 5 ते 75 रुपयांपर्यंत वाढ

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१५ ऑक्टोबर २०२२


महसूल वाढीच्या दृष्टीने एसटी महामंडळाकडून प्रवास भाड्यात 5 ते 75 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. ही वाढ हंगामी असून दिवाळीच्या दरम्यान महसूल वाढीसाठी हा निर्णय घेण्यात आल्याच महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. 20 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या दरम्यान, केवळ दिवाळीच्या कालावधीसाठी एसटी प्रवास भाडेवाढ करण्यात येणार आहे.

ज्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केले आहे त्या प्रवाशांकडून आरक्षण तिकीट दर आणि नवीन तिकीट दर यातील फरक घेण्यात येईल. ही भाडेवाढ एसटीच्या मासिक, त्रैमासिक आणि विद्यार्थी पासेसना लागू करण्यात येणार नाही. 1 नोव्हेबरपासून भाडेवाढ संपुष्टात येईल आणि नेहमीप्रमाणे तिकीट दर आकारले जातील असे एसटी महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *