आजीच्या स्मरणार्थ,चास गावातील ग्रामस्थांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप…

आंबेगाव : – ब्युरोचिफ ,मोसीन काठेवाडी
– चास (ता. आंबेगाव) येथे कै. सौ. जयवंतबाई बाबुराव बारवे यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू दिपकशेठ वामन बारवे यांनी कोरोनाच्या पार्ष्वभुमिवर सामाजिक बांधिलकी जपत चास गावातील ग्रामस्थांना सॅनेटाईजर व मास्क वाटप केले.

      कोरोनामुळे जग संकटात सापडले आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी नागरिकांनी मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा, या उद्देशाने दिपकशेठ बारवे यांनी आजीच्या स्मरणार्थ चास गावातील ग्रामस्थांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले.
       याप्रसंगी दिलीप बारवे, संभाजी बारवे, दत्तात्रय बारवे, सचिन बारवे, महेश बारवे, संदिप पोकळे, पंढरीनाथ शेगर व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

<