माणुसकी विरुद्ध खोकासुर अशी ही लढाई – आदित्य ठाकरे

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१५ ऑक्टोबर २०२२


शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके आणि भाजप-बाळासाहेबांची शिवसेना युतीचे उमेदवार मुरजी पटेल यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आणि समर्थकांच्या मिरवणुकीने जाऊन अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज शुक्रवारी दाखल केले.लटके यांच्याबरोबर शिवसेनेबरोबरच महाविकास आघाडीतील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तर पटेल यांच्याबरोबर भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेतील ज्येष्ठ नेते उपस्थित होते. दोन्ही उमेदवारांच्या समर्थक नेत्यांनी दणदणीत विजय मिळण्याचा दावा केला आहे. यावेळी आदित्य ठाकरेंनी विरोधकांवर टीका केली आहे.

माणुसकी विरुद्ध खोकासुर अशी ही लढाई असल्याची टीका शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे. लटके यांनी निवडणूक लढवू नये, यासाठी प्रयत्न करण्यात आले. सरकारचा पालिकेवर दबाव होता. पण न्यायालयाने दणका दिला. साम, दाम, दंड, भेद या सर्व बाबींचा वापर होत आहे. आम्ही गद्दारांबरोबर नाही, हे दाखविण्यासाठी ही निवडणूक असल्याचे त्यांनी सांगितले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *