कुकडी धरण प्रकल्पाचे पाणी पेटले, माजी गृहमंत्री वळसे पाटील आमदार अतुल बेनके यांची कुकडी कार्यालयावर धडक

नारायणगाव

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कुकडी धरणप्रकल्पातील राखीव ठेवलेले पाणी केवळ श्रीगोंदा तालुक्यासाठी आणखी तीन दिवस सोडण्याचे लेखी आदेश दिले आहेत.
दरम्यान कुकडी धरण प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणावर घट झाली असताना. हे पाणी पूर्व भागात सोडले तर जुन्नर आंबेगाव च्या जनतेला पिण्यासाठी देखील पाणी उपलब्ध राहणार नाही यासाठी आज कुकडी धरण प्रकल्पाच्या कार्यालयावर माजी गृहमंत्री व आमदार दिलीप वळसे पाटील तसेच जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या वतीने कुकडी धरण प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता कार्यालयात पाणी न सोडण्याबाबत निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी राष्ट्रवादी पक्षाचे अनेक पदाधिकारी तसेच शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *