खेड तालुक्यातील २५ दिव्यांगांना दिवाळी फराळाचे वाटप

अक्षता कान्हुरकर
बातमी प्रतिनिधी
३ नोव्हेंबर २०२१

खेड


प्रहार अपंग क्रांती आंदोलन खेड तालुका आणि सरपंच पप्पू दादा टोपे यांच्या संयुक्त विद्यमाने खेड तालुक्यातील २५ दिव्यांग बांधवांना दिवाळी सणानिमित्त पंचायत समिती खेड च्या आवारात सकाळी ११.०० वा. मिठाई देउन वाटप करण्यात आले. याप्रसंगी खेड तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजय जोशी, गणेश रोकडे भाऊसाहेब, गणेश काळे भाऊसाहेब, कार्यालयातील कर्मचारी तसेच दिव्यांग बांधव उपस्थित होते.

Distribution of Diwali Farala to 25 persons with disabilities in Khed taluka
खेड तालुक्यातील २५ दिव्यांगांना दिवाळी फराळाचे वाटप

खेड तालुक्यातील २५ दिव्यांगांना दिवाळीच्या सणासाठी तहसीलदार कार्यालय खेड आवारात मिठाई वाटून दिवाळीच्या सणासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी तहसीलदार खेड तालुका अधिकारी डॉ. वैशाली वाघमारे, सुनील नंदकर भाऊसाहेब, कार्यालयातील शिपाई दिव्यांग बांधव उपस्थित होते. प्रहार अपंग क्रांती आंदोलन खेड तालुका अध्यक्ष जिवन भाऊ टोपे, उपाध्यक्ष राजेंद्र सुपेकर, सचिव शिव व्याख्याते संदीप बारणे, शेखर मंडलिक मच्छिंद्र धनवे यांनी तालुक्यातील दिव्यांग बांधवांना दिवाळीच्या सणासाठी शुभेच्छा दिल्या.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *