माता सुरक्षित, घर सुरक्षित मोहिमेअंतर्गत ५२५ जणींची तपासणी

पिंपरी प्रतिनिधी
१४ ऑक्टोबर २०२२


राज्य सरकारच्या माता सुरक्षित तर घर सुरक्षित ‘ मोहिमेअंतर्गत महापालिकेतर्फे ५२५ महिलांची तपासणी करण्यात आली . १८ वर्षांवरील सर्व महिलांची तपासणी २६ सप्टेंबरपासून केली जात आहे . त्याअंतर्गत , बुधवारी वायसीएम रुग्णालयात आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले . त्यास आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ . पवन साळवे , अधिष्ठाता डॉ . राजेंद्र वाबळे , वैद्यकीय अधीक्षक उज्ज्वला आंदुरकर , उपवैद्यकीय अधीक्षक डॉ . मनीषा सूर्यवंशी , ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ . शैलजा भावसार , डॉ . वर्षा डांगे , भूलतज्ज्ञ डॉ . मारुती गायकवाड , डॉ . रसिका वाघमारे , डॉ . चैताली इंगळे , यशस्विता बाणखेले आदी उपस्थित होते . २६ ऑक्टोबरपर्यंत महापालिकेच्या सर्व दवाखाने व रुग्णालयांत ‘ माता सुरक्षित तर घर सुरक्षित ‘ मोहीम राबविण्यात येणार असून महिलांनी त्याचा लाभ घेऊन आरोग्य तपासणी करून घ्यावी , असे आवाहन डॉ . साळवे यांनी केले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *