संजय राऊत यांनी विदर्भात येऊन बॉम्ब फोडण्याची भाषा करू नये – रवी राणा

२७ डिसेंबर २०२२

नागपुर


शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नागपुरला जाऊन बॉम्ब फोडणार असल्याचे म्हटले होते. तसेच बॉम्ब बरेच आहेत. वाती काढल्या आहेत. फक्त त्या वाती पेटवण्याचा अवकाश आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावर प्रतिक्रिया देताना आमदार रवी राणा यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे.

संजय राऊत यांनी विदर्भात येऊन बॉम्ब फोडण्याची भाषा करू नये. संजय राऊत यांच्या पक्षातील ४० आमदार गेले हाच बॉम्ब फुटला आहे.आम्ही जर बॉम्ब फोडला तर संजय राऊत, उद्धव ठाकरे सुद्धा दिसणार नाहीत. कदाचीत आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे जेलमध्ये जातील.असा इशारा सुद्धा राणा यांनी दिला. देवेंद्र फडणवीसांनी बॉम्ब फोडला, तर संजय राऊतांना कुठं पळायचं आणि कुठं लपायचं सुचणार नाही. उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षात काय काम केलं हे दाखवावं मी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना बक्षिस देईन असं खुलं आव्हान देखील राणा यांनी दिलं आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *