आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील गोहे खुर्द:च्या सायरखळा गाडेकरवाडी ते वैधवाडी (पोखरी) मार्गे जाणाऱ्या रस्त्याची दयनिय अवस्था…

आंबेगाव
आंबेगाव ब्युरोचिफ
मोसीन काठेवाडी

गेल्या दोन वर्षा पासून  आंबेगाव तालुक्यातील गोहे खुर्द:च्या सायरखळा गाडेकरवाडी ते वैधवाडी (पोखरी)रस्त्याची दयनीय अवस्था ! झाली आहे. व सततच्या पाऊसाने चिखलमय  रस्ता बनला असुन वाहतुकीस  धोकादायक ठरत आहे.
                 आंबेगाव तालुक्याच्या अतिदुर्गम आदिवासी पश्चिम पट्टयातील गोहे खु:च्या अतिदुर्गम भागातील पाचेवड सायरखळा गाडेकरवाडी   साठी दळणवळणासाठी महत्वाचा दुवा असणारा ढाकाळे मार्गी वैदवाडी वरुन पोखरीला जाणारा हा रस्ता मागील दोन वर्षापासून अंत्यत खराब व खाचखळगेचा झाला आहे. आपघाताला आम़त्रण देणारी तारेवरचीच कसरतच करावी लागते. जिवनावश्यक वस्तू खरेदी व  आरोग्यसेवेसाठी हाच एकमेव येथील कष्टकरी गरीब आदिवासी शेतकरी बांधवांना आहे. कुणी आजारी रूग्ण दवाखान्यात नेताना तर मोठी दयनीय अवस्था होते. आमचा कुणी वाली आहे की नाही आमचा रस्ता दुरुस्त करा व आम्हाला बी तुमच्या संग विकासाची वाटेन येऊ दया की हो, अशी आर्तव हाक येथील आदिवासी बांधवांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *