बालवाडी शिक्षिकांना किमान वेतनवाढ आणि कामात कायमस्वरुपी करून घ्यावे- उपमहापौर केशव घोळवे

बातमीदार- रोहित खर्गे, पुणे विभागीय संपादक

पिंपरी- दि ३ डिसेंम्बर (गुरुवार), पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत बालवाडी शिक्षिका गेल्या २२ वर्षापासून मानधनावर काम करीत असून प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या पगाराचा विचार करता त्यांना किमान वेतनानुसार कमी मानधन दिले जाते. कमी मानधन देत असून सुध्दा तेही वेळेवर मिळत नसल्याने त्याबाबतच्या ब-याच तक्रारी येत आहेत.

बालवाडी शिक्षिकांना त्यांचे स्वतःचे कामकाज सांभाळून त्यांच्याकडे पोलिओचे कामकाज, निवडणूक विषयक कामकाज, जनगनणा विषयक कामकाज व कोरोना विषयी सर्वेचे कामकाज, राष्ट्रीय कामकाज अशी वेळोवेळी अतिरिक्त कामे सुध्दा सोपविण्यात येतात. ही कामे सुध्दा त्या जबाबदारीने पार पाडतात.

तरी बालवाडी शिक्षिकांना वेळेवर मानधन देणेकामी योग्य ती कार्यवाही करणेत यावी तसेच प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना नुकताच सातवा वेतन आयोग लागू करून पगारवाढ देण्यात आली. त्याप्रमाणे मानधन बालवाडी शिक्षिकांना सुध्दा पगारवाढ व दिवाळी बोनस तसेच मनपा कर्मचारींना यांना देण्यात येणारी धन्वंतरी योजनेमध्ये बालेवाडी शिक्षकांचा समावेश करुन त्यांना महानगरपालिकेमध्ये कायमस्वरुपी कर्मचारी म्हणून त्यांचा समावेश करावा, या बाबत उपमहापौर केशव हनुमंत घोळवे यांनी आयुक्त श्रावण हार्डीकर यांना निवेदन दिले.