उद्धव ठाकरेचं मशाल हे चिन्ह होऊच शकत नाही – नितेश राणे

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१४ ऑक्टोबर २०२२


अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची आजची शेवटची तारीख असून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ऋतूजा लटके तर भारतीय जनता पार्टीकडून मुरजी पटेल अर्ज भरला. या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. यावेळी दोन्ही बाजूकडून एकमेकांवर टीका करण्यात आली आहेत. भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे गटाला लक्ष्य करताना त्यांच्या नव्या निवडणूक चिन्हावरुन भाष्य केलं आहे. ही मशाल नसून आईस्क्रीमचा कोन असल्याचा टोला नितेश राणेंनी लगावला आहे.

तसेच उद्धव ठाकरे या माणसाचं चिन्ह हे मशाल नाही कारण त्याच्यातली आग कधीच विझली आहे. खरं तर आईस्क्रीमचा कोन मिळाला आहे जो थंड पडलेला आहे, असं नितेश राणे म्हणाले. उद्धव ठाकरेचं मशाल हे चिन्ह होऊच शकत नाही. त्या माणसामधली आग संपलेली आहे,असंही नितेश राणेंनी म्हटलं आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *