पुणे जिल्हा शिक्षण मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी हडपसर पुणे मानसिक आरोग्य जागृकता दिनानिमित्त वेबिनार चे आयोजन करण्यात आले

मंगेश शेळके
बातमी प्रतिनिधी
१४ आक्टोबर २०२१

ओझर

नुकतेच पुणे जिल्हा शिक्षण मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी हडपसर पुणे मध्ये मानसिक आरोग्य जागृकता दिनानिमित्त वेबिनार चे आयोजन केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सौ. स्वाती दीपक आलुरकर मॅडम मनशक्ती केंद्र लोणावळा या उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्य जागृकता या विषयावर मार्गदर्शन केले, यावेळी त्या म्हणाल्या शारीरिक आरोग्याप्रमाणेच मानसिक आरोग्य महत्त्वाचे आहे. मानसिक आरोग्यावर दुष्परिणाम होऊ नये यासाठी शक्य होईल तितके स्वतःलाच जपण्याचा प्रयत्न करा. जागतिक आरोग्य संघटनेच्या २०१८ ते २०१९ अहवालानुसार मानसिक आजाराने ग्रासलेल्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यांनी सांगितले की, मी म्हणजे मन. इच्छा आणि अपेक्षा या मनाला होतात. शरीर हे केवळ साधक आहे. आपण आज तंत्रज्ञानाने नक्कीच प्रगल्भ झालेलो आहोत, पण जीवन कसं जगायचं याचं प्रशिक्षण घेणे काळाची गरज झाली आहे. भय, राग, नकारात्मकता, ताण हे मनाचे आजार आहे. अती अपेक्षांमुळे आज माणूस मानसिक तणावाखाली सतत दिसतो, त्यासाठी किमान 5 मिनिटे वेळ काढून मेडिटेशन करणं आवश्यक आहे. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य सौ अश्विनी शेवाळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनयामध्ये सांगितले की मुलांचे मन सुदृढ असेल तरच त्यांचे अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे सोपे होते.तसेच चांगले वाचणे चांगले ऐकणे चांगले बोलणे यामुळे मानसिक आरोग्य चांगले राहते व आपले मन व आपला मेंदू यांच्यामध्ये समन्वय साधावा व आपले जीवन यशस्वी करावे असे विद्यार्थ्यांना सांगितले

या कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन सौ. देवयानी किरवे यांनी, तर पाहुण्यांची ओळख योगिता शिंदे तसेच आभार प्रदर्शन पूजा खटके यांनी केले. यावेळी कोमल नवले, कीर्ती श्रीखंडे, संजय बारगळ, सौदामिनी देशमुख, शीला कुदळे हे कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *