लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न होतोय – आदित्य ठाकरे

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१४ ऑक्टोबर २०२२


उच्च न्यायालयाने तातडीने लटकेंना राजीनामा स्वीकारण्याचे निर्देश मुंबई महानगर पालिकेला दिले आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून सत्ताधाऱ्यांवर टीकास्र सोडलं जात असतानाआदित्य ठाकरेंनी हा सगळा क्रूर प्रकार सुरू असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

अशा निवडणुकीतही खोके सरकार इतकं निर्दयी होऊ शकतं. असे खेळ खेळू शकतं. हा लोकशाहीतला क्रूर प्रकार झालाय. आदेश कोण देतं? कुठे जातात आदेश? हे सगळं वरपासून खालपर्यंत अधिकारी आमच्याशीही बोलत असतात. काल-आज जे सगळं घडलं त्यावरून आपल्या राज्यात लोकशाही आहे का? हा मोठा प्रश्न निर्माण झालाय. लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न होतोय, ते पाहाता आपण फॅसिझमच्या दिशेनं चाललो आहोत, असं आदित्य ठाकरे म्हणाले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *