जो कायदा राज ठाकरेंना लागू आहे तोच मला लागू का होत नाही? – सुषमा अंधारेे

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१४ ऑक्टोबर २०२२


उद्धव ठाकरे गटाच्या ‘महाप्रबोधन यात्रे’ मध्ये उद्धव ठाकरे समर्थक नेत्यांनी केलेल्या भाषणांवरुन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल करणे, राष्ट्रपतींचं नाव घेऊन खिल्ली उडवणारं भाष्य करणे यासारखे आरोप विरोधकांकडून केले जात आहेत. त्याचबरोबरच उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या सुषमा अंधारेे विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दाखल झालेल्या गुन्ह्याचा संदर्भ देत त्यांनी थेट राज ठाकरेंचा उल्लेख चुलत भाऊ असा केला आणि त्यांना वेगळा कायदा लागू होतो का असा प्रश्न सत्ताधाऱ्यांना विचारला.कायद्यानुसार सर्वांना नियम सारखे हवेत असं असताना राज यांच्या नकलांवरुन कधी गुन्हे दाखल झाले का असा सवाल करत माझ्यासाठीच वेगळा नियम का असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

राज दादा आमचे चुलत भाऊ. आमचे राज दादा एवढ्या सगळ्या मिमिक्र्या करतात त्या वेळी काय करता? राज भाऊंवर किती केसेस दाखल केल्या तुम्ही विचारलं पाहिजे,असं सुषमा अंधारेे म्हणल्या. तसेच जो कायदा राज ठाकरेंना लागू आहे तोच मला लागू का होत नाही? असा प्रश्न विचारला. तसेच पुढे त्यांनी राज्यामधील सत्ताधाऱ्यांना थेट आव्हानही दिलं. तरीही माझ्यावर गुन्हे दाखल करायचे असतील आणि असे गुन्हे दाखल केल्याने सुषमा अंधारे घाबरेल आणि माघार घेईल असं वाटत असेल तर तुम्ही भ्रमात आहात. जागे व्हा! असा खोचक सल्ला अंधारे यांनी दिला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *