शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करावेत  – आंबेगाव तालुका कृषी आधिकारी तुळशिराम चौधरी

घोडेगाव प्रतिनिधी,मोसीन काठेवाडी

शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करावेत : – आंबेगाव तालुका कृषी आधिकारी तुळशिराम चौधरी यांचे आवाहन
————–
३१ डिसेंबर २०२० अंतिम मुदत
राज्य शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण अभियानांअतर्गत २०२० -२१ या आर्थिक वर्षासाठी अर्ज स्वीकारणे सुरु झाले आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज दाखल करावे , असे आवाहन आंबेगाव तालुका कृषी आधिकारी टि.के चौधरी यांनी केले आहे.
चौधरी म्हणाले , राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत कृषी यांत्रिकीकरण अभियानांतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर ट्रॅक्टरचलित सर्व प्रकारची अवजारे, पॉवर टिलर ( छोटा ट्रॅक्टर ) तसेच कांदा चाळ , शेततळे, शेततळे अस्तरीकरण अशा विविध योजनांचा लाभ देण्यात येतो. त्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन पध्दतीने शासनाच्या अधिकृत वेबसाइटवर आर्ज करावयाचा आहे. ही नोंदणी करताना गावातील सेतू कार्यालयात अर्ज करता येतो. या अर्जासाठी शेतकऱ्याने सातबारा उतारा , आधार कार्ड झेरॉक्स बँक पासबुक झेरॉक्स , आधार कार्डशी संलग्र मोबाइल क्रमांक महत्वाचा आहे तसेच अनुसूचित जमाती ,अनुसूचित जाती या वर्गातील लाभार्थीचा जातीचा दाखला यादी मागदपत्रे आवश्यक आहेत. या योजनेत अर्ज दाखल करण्याची आंतिम मुदत या महिन्याच्या अखेरीस ३१ डिसेंबरपर्यंत आहे
सन 2020-21 करीता महाराष्ट्र शासन कृषि विभाग मार्फत ज्या शेतक-यांना ट्रॅक्टर, पावर टिलर व इतर औजारे ,ठिबक तुषार संच,शेततळे,शेततळे अस्तरीकरण, पी.व्ही.सी.पाइप,पंम्पसेट,इंजीन,फळबाग, कांदाचाळ,शेडनेट,हरितगृह,शीत साखळी,प्रक्रिया उद्योग,सदर योजना घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घ्यायचा आहे अश्या शेतक-यांनी स्वतः किवा आपल्या जवळच्या सीएससी केंद्रात जाऊनऑनलाइन अर्ज करावा त्यासाठी आधार कार्ड,आधार कार्डवर नोंदणीकृत मोबाईल नंबर,बँकेचे पासबुक, सातबारा ,आठ अ , पँन नंबर /मतदान ओळखपत्र,आयकार्ड साईज फोटो, एस.सी.,एस.टी.असल्यास जातीचा दाखला आवश्यक आहे*
*https://mahadbtmahait.gov.in/

*https://mahadbtmahait.gov.in/farmer/login
या योजनेच्या अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी कृषी सहायक , कृषी पर्यवेक्षक तसेच मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून योजनेत सहभाग घ्यावा. असेही टी.के चौधरी यांनी म्हटले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *