लाच घेताना पोलिस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

०८ नोव्हेंबर २०२२

पुणे


वर्षातील दहा महिन्यांत शहर पोलिस दलातील दहा पोलिस लाचलुचपत विभागाच्या (एसीबी) सापळ्यात अडकले आहेत. त्यामध्ये एक अधिकारी आणि नऊ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. याप्रकरणी विविध पोलिस ठाण्यांत आठ गुन्हे दाखल आहेत. लाचेची मागणी आणि लाच घेताना रंगेहाथ पकडल्याचे हे गुन्हे आहेत. चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यातील एका पोलिस हवालदारासह दोघांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रविवारी (दि. ६) सायंकाळी २५ हजार रुपयांची लाच घेतना औंध पोलिस चौकीच्या परिसरात रंगेहाथ पकडले. त्यामुळे पोलिस दलातील लाचखोरीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.। पोलिस हवालदार प्रशांत विठ्ठल जाधव आणि अजित शांताराम गायकवाड अशी लाचखोर पोलिसांची नावे आहेत. दोघांविरुद्ध चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका २१ वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे. दोघांना न्यायालयाने ९ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

सर्वांत गंभीर प्रकार म्हणजे गायकवाड याला गेल्या काही दिवसांपूर्वी वाहतूक विभागाला संलग्न करण्यात आले होते. तरीदेखील त्याने जाधव याच्यासोबत मिळून २५ हजार रुपयांची लाच घेतली आहे. त्यामुळे वाहतूक विभागाचे कामकाज दिले असतानादेखील चौकीला थांबून दोघे अर्थपूर्ण कर्तव्य चोख पार पाडत होते. गेल्या काही दिवसांपासून दोघांचे अनेक कारनामे वरिष्ठांच्या कानावर गेले होते. त्यांना अनेकदा समजदेखील देण्यात आली होती. मात्र, तरीदेखील त्यांच्या वर्तनास सुधारणा होत नव्हती. अखेर दोघे एसीबी च्या जाळ्यात अडकले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *