शिवसेना बाळासाहेब ठाकरे; आता नावावरुन आणि चिन्हांवरून शिंदे आणि ठाकरेंमध्ये वादाची शक्यता

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१० ऑक्टोबर २०२२


एकनाथ शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे गट वादाला नवं वळण मिळालं आहे. शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठविण्याच्या निर्णय निवडणूक आयोगाने शनिवारी घेतल्याने साडेतीन महिन्यांपासून सुरू असलेला राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाल्याचं पहायला मिळत आहे.

शिवसेना ठाकरे गटांकडून निवडणूक आयोगाला तीन निवडणूक चिन्हांचा पर्याय देण्यात आला आहे. यामध्ये त्रिशुळ, उगवता सूर्य आणि धगधगती मशाल असे तीन पर्याय देण्यात आले आहेत. त्याशिवाय, पक्षाच्या नावांसाठी तीन पर्याय देण्यात आले आहेत. यामध्ये शिवसेना-बाळासाहेब ठाकरे, शिवसेना-बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीन नावांचा समावेश आहे. दुसऱ्या बाजूला शिंदे गटानेदेखील ठाकरे गटाची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे म्हटले जात आहे. शिंदे गटानेदेखील निवडणूक आयोगाला दिलेल्या चिन्ह्यांच्या पर्यायात उगवता सूर्य आणि त्रिशूळचा पर्याय दिल्याची माहिती आहे. तसेच पक्षाच्या नावातही बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *