उद्धव ठाकरेंच्या आव्हानला शिंदे गटातील संदीपान भुमरे यांनी दिलं उत्तर

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१४ ऑक्टोबर २०२२


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त षण्मुखानंद सभागृहात आयोजित ‘अमृत महोत्सव’ कार्यक्रमात बोलताना ‘हिंमत असेल मैदानात या, मी मैदानात उतरलो आहे अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला जाहीर आव्हान दिलं आहे. यावेळी त्यांनी शिंदे गटाला लक्ष्य केलं. मर्दांच्या हाती मशाल आहे असंही म्हटलं. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या या आव्हानाला आता शिंदे गटानेही उत्तर दिलं आहे.

शिंदे गटातील संदीपान भुमरे यांनी उद्धव ठाकरेंच्या आव्हानला उत्तर दिलं आहे. संदीपान भुमरे म्हणाले की, आम्हीपण मैदानातच आहोत, घरात बसलेलो नाही. हे अडीच वर्षं घरात बसले होते, तेव्हाही आम्ही मैदानात होतो आणि आत्ताही आहोत. हे आमच्यामुळे अडीच वर्षानंतर मैदानात आले आहेत. ही क्रांती झाली नसती तर अजून अडीच वर्षं घरातच बसून राहिले असते. कोण कोणाल काय दाखवतं हे अडीच वर्षानंतर कळेलच.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *