सह शहर अभियंतापदी अखेर महापालिकेतील अधिकाऱ्याला पदोन्नती!

रोहित खर्गे
विभागीय संपादक
१४ ऑक्टोबर २०२२

पिंपरी


पिंपरी- चिंचवड महापालिका आस्थापनेवर राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती न करता महापालिकेतील अनुभवी अधिकाऱ्यांना संधी द्यावी. या मागणीला अखेर यश मिळाले. स्थापत्य विभागाच्या सह शहर अभियंतापदी मनोज सेठिया यांची नियुक्ती करण्यात आली.

भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी महापालिकेतील महत्वाच्या पदांवर राज्य शासनाचे अधिकारी नियुक्त न करता महापालिका प्रशासनातील अनुभवी अधिकाऱ्यांना पदोन्नतीद्वारे संधी द्यावी, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली होती. तसेच, महापालिका प्रशासक व आयुक्त शेखर सिंह यांनाही पत्राद्वारे सूचित केले होते.

भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या मागणीला यश

आमदार लांडगे यांच्या मागणीची दाखल घेत महापालिका प्राशसनाने स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज सेठिया यांना सह शहर अभियंतपदी पदोन्नती दिली आहे. त्यानुसार कामकाज वाटपाचे आदेशही निगर्मीत करण्यात आले आहेत.

महापालिका सह शहर अभियंतापदी मनोज सेठिया यांना संधी

पिंपरी- चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवर ‘सह शहर अभियंता’ (स्थापत्य विभाग) अभिनामाची पदे शासन मंजूर असून, रिक्त पद पदोन्नतीने भरण्याबाबत दि. १२ ऑक्टोबर रोजी पदोन्नती समिती सभा आयोजित केली होती. या सभेत पदोन्नतीच्या निर्णयाला मान्यता देण्यात आली आणि गुरुवारी शेखर सिंह पदोन्नतीचे आदेश काढले.

अनुभवी अधिकाऱ्यांचा शहर विकसात फायदा : आमदार लांडगे

आमदार लांडगे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहरातील विकासप्रकल्प आणि विविध योजना गतीमान करण्यासाठी शहरातील संपूर्ण माहिती असलेला अनुभवी अधिकारी महत्त्वाच्या पदावर असल्यास शहराच्या हिताचे ठरणार आहे. त्यामुळे ‘‘सह शहर अभियंता’’ या पदासाठी महापालिकेतील अधिकाऱ्याला पदोन्नती मिळावी, अशी आमची मागणी होती. वास्तविक, महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात महापालिकेत राज्य शासन नियुक्त अधिकारी विरुद्ध महापालिका अधिकारी असा अप्रत्यक्ष संघर्ष निर्माण झाला होता. त्यामुळे महापालिका अधिकाऱ्यांमध्ये काहीशी नाराजी होती. आता महापालिकेतील अधिकाऱ्याला सेवाज्येष्ठतेनुसार संधी देण्यात आली. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *