माणुसकीला काळे फासणाऱ्या त्या तीन डॉक्टरांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी – दि २ मे २०२१
पिंपरी चिंचवड येथील ऑटो क्लस्टर कोविड सेंटर मध्ये बेड मिळवून देण्यासाठी त्यांच्या नातेवाइकांकडून एक लाख रुपये लाच घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त तीन उल्हास जगताप (वय ५५, चिंचवड ) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता यात पोलिसांनी तीन डॉक्टरांना अटक केली आहे.
स्पर्श प्रायव्हेट लिमिटेड चे डॉक्टर प्रवीण जाधव वाल्हेकरवाडी येथील पद्मजा हॉस्पिटलचे डॉक्टर शशांक राळे आणि डॉक्टर सचिन कसबे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 23 एप्रिल रोजी पहाटे सुरेखा अशोक वाबळे (राहणार रामदास नगर चिखली ) यांना ऑटॉक्लस्टर येथील कोविड रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणले होते. या रुग्णालयात रुग्ण दाखल करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क लागत नसताना आरोपीने सुरेखा वाबळे यांच्या नातेवाइकांकडून ICU बेड मिळवून देण्याच्या उद्देशाने धमकावून ऍडमिट करण्यासाठी पैसे लागतात असे सांगून, एक लाख रुपये घेतले व त्यांची फसवणूक केली सुरेखा वाबळे यांच्या नातेवाइकांकडून आरोपी डॉक्टर प्रविण जाधव यांनी एक लाख रुपये घेतले त्यातील कट प्रॅक्टिस म्हणून वीस हजार रुपये पद्मजा हॉस्पिटल मधील दोन्ही डॉक्टर ना दिले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला .
या प्रकरणाचा महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक कुंदन गायकवाड व विकास डोळस यांनी भांडाफोड करून सदर व्यक्तीवर कारवाई व सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती.