लवकरच इंदू मिल स्मारकाचे काम पूर्ण करू, देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन

०६ डिसेंबर २०२२


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त इंदू मिलचे काम लवकरच पूर्ण होईल असे आश्वासन दिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन केलं. यानंतर इथल्या एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते.

आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने देशभरातून लाखो अनुयायी चैत्यभूमीवर दाखल झाले आहे. या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. यावेळी विविध पक्षाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.

उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दादरच्या इंदू मिलमधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, इंदू मिलमधील स्मारकारचं काम वेगाने सुरु आहे. आज राज्य सरकारच्या वतीने मी आश्वासन देतो की त्याचा देखील कार्यक्रम लवकरच होईल असे देखील ते म्हणाले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *